cineworld

एप्रिलमध्ये रॉकेलचा साठा रेशनिंग दुकानात आलाच नाही 

माण तालुक्यातील वाड्या-वस्त्यावरील चित्र

सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रॉकेल पोहोचले मात्र एप्रिल महिन्यात माण तालुक्याला रॉकेल साठा आला नाही. कारण कॉन्ट्रक्टरच्या टँकरचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे रॉकेल साठा माण रेशनिंग दुकानदाराला मिळाला नाही, अशी माहिती माण पुरवठा शाखेमधून मिळाली.

- प्रविण राजे
दहिवडी, दि. 30 ः घरगुती गॅस महाग झाल्यामुळे सध्या लोकांनी जुने स्टोव्हचा वापर सुरू केला आहे. परंतु, शिधापत्रिका दुकानदारांकडे एप्रिल महिन्यातील रॉकेचा कोटा आला नसल्याने माण तालुक्यात वाड्या-वस्त्यांवरील सर्वसामान्यांची परवड सुरू आहे. 
कोरोना महामारीमुळे जगणे अवघड झाले आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे घरगुती गॅस महाग झाला. काही लोकांनी घरात गॅस असताना देखील जुने स्टोह स्वयंपाकासाठी बाहेर काढले. स्वस्त रॉकेल असल्यामुळे स्टोवरील स्वयंपाक परवडतो. परंतु, माणमध्ये रॉकेलचा एकही थेंब कोणालाही मिळाला नाही. रॉकेल दुकानात जाऊन लोकांनी कित्येक वेळा विचारले असता रेशनिंग दुकानदार सांगतात की एप्रिल महिन्यात रॉकेलचा साठा आला नाही. पत्रकार यांनी माण तहसीलदार यांना विचारले असता त्यांनाही उत्तर दिले की रॉकेल या महिन्यात आले नाही. माणमध्ये रॉकेल आले नाही. शेतकरी संकटात आहे. वस्तीला राहणार्‍या आणि विजेचा पुरवठा नसणारे शेतकरी एक महिना झाले अंधारात रात्र काढत आहेत. अधून-मधून येणार्‍या वादळी वारे आणि पावसामुळे वाळलेले जळणदेखील भिजून जात असल्यामुळे स्वयंपाक बनवणे देखील मुश्किल झाले आहे. नक्की माणमध्ये रॉकेल का आले नाही? याबाबत जनतेमध्ये संभ्रम अवस्था आहे. मात्र, माणमध्ये रेशनिंग दुकानदारांच्या संघटना करतात तरी काय. संपूर्ण एप्रिल महिना संपत आला तरीही संघटना अजूनही शांतच आहेत.
माणमधील कोणत्याही संघटनेने पुरवठा शाखेकडे रॉकेलचा साठा का आला नाही ? याबाबत विचारणा केली नाही. एप्रिल महिना संपून गेला जनता मात्र अजूनही रॉकेल कधी येईल याची वाट पाहत आहे.