जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बुधवारी आतापर्यंत सर्वाधिक 304 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
सातारा : देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अगदी थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी काही नियोजन नसतानासुध्दा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्या कालावधीत उपाय योजना करण्यात सरकार पूर्णपणे अपशयी ठरले आहेत. त्यामुळे लोकांचे भूकबळी जाण्यापेक्षा सततचा लॉकडाऊनचा पर्याय रद्द करून शासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष द्यावे. तसेच एसटी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने डफली आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व्हेजीटेबल अॅन्ड जनरल मार्केट (भाजी मंडई) रा मार्केटमधील 18 गाळेधारकांची उर्वरित डिपॉझीट रक्कम रुपरे 22,01,700/रेणेबाकी होती. राबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देवूनही गाळेधारक शिल्लक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्रामुळे त्रांना 22 जून 2020 रोजी नोटीस देवून उर्वरित डिपॉझीट रक्कम भरणेबाबत कळविण्रात आलेले होते. दरम्रान एका गाळाधारकाने रक्कम भरल्राने उर्वरित 17 गाळे सील करण्रात आले आहे. सदर कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्रात आले आहे.
खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
कोरोना विषाणूनं अवघ्या जगात हाहाकार उडाल्यानं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. पण नोकरी अन् शिक्षणानिमित्त परशहरात ‘झेप’ घेतलेली ‘बहीण-भावंडं’ पुन्हा कुटुंबाच्या छायेखाली आली. बहीण-भावामध्ये कितीही भांडण अथवा चीड असली तरी दोघांमधील अतूट नात्यातील ‘प्रेम’ त्यांना एकत्र आणतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या निमित्तानं ‘बहीण-भावा’चं प्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचं पाहावयास मिळालं.
रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आनंद गजानन गोसावी (वय 48) रा. व्यंकटपुरा, सातारा यांचा आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना युद्धात धोका पत्करून सेवा बजावताना दुसर्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे.
आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
हिंगाची हरभऱ्या एवढी गोळी करून दररोज खावी ७ दिवस . पोटदुखी व वायगोळा जातो .
परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकदा पाऊस सुरू झाला तो कधी थांबेल याचा अंदाज लावता येत नाही. कधी-कधी तर गावांचा कित्येक दिवस संपर्क ही तुटतो. यावर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी परळी खोर्यात जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे काळोशी येथील तलाव हा धोकादायक स्थितीत आला आहे. या तलावाच्या सांडव्याशेजारील भिंतीचा मातीचा भराव दिवसेंदिवस ढासळत असल्याने तलावा शेजारील घरांमधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.