हींग या बहुगुणी औषधाचे लाभदायक उपयोग


हिंगाची हरभऱ्या एवढी गोळी करून दररोज खावी ७ दिवस . पोटदुखी व वायगोळा जातो .

 १) वायगोळा व पोटदुखीवर :-- हिंगाची हरभऱ्या एवढी गोळी करून दररोज खावी ७ दिवस . पोटदुखी व वायगोळा जातो .

२) बाळंतीणीच्या मस्तक शुळांवर :-- हिंग भाजून तुपांत कालवून सेवन करण्यास द्यावा ७ दिवस .

३) विचवाच्या विषावर :-- हींग रुईच्या चिंकात वाटूंन लेप करावा .

४) व्रणातील कृमी दूर होण्यास :-- हिंग व कडुनिंबाची पानें वाटून लेप करावा .

५) पटकीवर ( कॉलरा ) यांवर :-- भाजलेला हिंग , कापूर व आंब्याच्या कोयातील मगज , समभाग घेऊन पुदिन्याच्या पानांच्या रसांत एकत्र खलून गोळ्या कराव्या . एकेक तासाच्या अंतराने एकेक गोळी घ्यावी . कॉलरा रुग्ण बरा होतो .

६) सर्दीने कानाचे दडपे बसल्यास :-- उत्तम हिंग कापसात गुंडाळून कानांत घालून ठेवावा .

७) अपस्मार ( घुरें , फेफरे ) यांवर :-- ५ ग्रॅम हिंग गुळाबरोबर द्यावे .

८) बहीरेपणावर ::-- उत्तम हिंग स्त्रीचे दुधांत उगाळून कानांत घालावा १४ दिवस . बहिरेपणा जातो .

९) मुलाच्या पोटांतील कोणत्याही रोगास ::-- उत्तम हिंग १० ग्रॅम घेऊन बी काढलेल्या पांढऱ्या कारल्यात भरून त्यांवर एक बोट जाड कणीक लिंपून गोवऱ्यात भाजून जळकी कणीक काढून आंतील कारले हिगासाह खलून हरभऱ्या एवढया गोळ्या करून ठेवाव्या . प्रसंगी शक्ती पाहून एक किंवा अर्धी गोळी दुधांत उगाळून चाटवावी .७ दिवस मुलाच्या पोटांतील सर्व रोग जातात.

१०) दातांस कीड लागल्यास :-- हिंग कापसात घालून दाढेत भरावा आराम मिळेल .

११) मुलांचे गुददद्वार बंद झाल्यास ( मलावस्तंभ ) ::-- भाजलेला हिंग व सैंधव १/१ ग्रॅम घेऊन चूर्ण करून एरडयात खलून कापडाच्या कांकडयास लावून गुदांत ठेवावा . व्दार मोकळे होते .

१२) मूळव्याधीवर मलम :-- उत्तम हिंग , नवसागर , सजजीखार यांचे चूर्ण करून तांब्याच्या भांडयात खलावे . हे लावल्याने आग न होता मोड ( कोंब ) जातात ( अथवा ) मुळव्याधीवर धुरी ---उत्तम हिंग २० ग्रॅम , मोरचुद १० ग्रॅम , मुरदाडशिग १० ग्रॅम , मायफळ १० ग्रॅम यांचे चूर्ण करून १४ पुडया कराव्या व त्याचा १४ दिवस गुददद्वारांस धूर द्यावा मोड ( कोंब ) जातात .

१३) कोणत्याही पोटशूळास ::-- हिंग , मिरे , सुंठ , पिंपळी , सैंधव ह्यांना समभाग घेऊन चूर्ण करावें व चिमुटभर चूर्ण ग्राम पाण्यांत घ्यावें ७ दिवस सर्व शुळांचा नाश होतो .

१४) गर्भ न राहण्यास :-- ५ ग्रॅम उत्तम हिंग तेलांत वाटूंन ऋतुकाळी १० दिवस प्याल्यास गर्भ राहत नाही .

१५) अग्नीनें भाजून झालेल्या जखमेस :-- उत्तम हिंगाचे पाणी करून भाजलेल्या ठिकाणी लावावे. जखमा बऱ्या होतात .

१६) गजकर्णावर ::- हिंग। लसूण , हळद , बिब्बा समभाग घेऊन खलून लावावें गजकर्ण जाते .

१७) पोट फुगल्यास ::- हींग , पादेलोण , ओवा , सैंधव यांचे चूर्ण करावें व चिमुटभर चूर्ण घ्यावें वरून गरम पाणी प्यावे . पोट उतरते .

१८) नारूवर ::- हींग , लसूण , साबण एकत्र वाटूंन नारूवर बांधावे व ५ ग्राम हे चूर्ण १ कप दह्यात दररोज २ वेळा सेवन करावे ३ दिवस. नारू जातो.