सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देणारा कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्यातच नव्हे तर देशात अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊसदर देता यावा यासाठी उपपदार्थ निर्मीतीवर जास्त भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
गुरुवार परज येथे गुरुवारी सांयकाळी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या रेडमुळे जुगारबाजांची पळापळ झाली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
'हॅलो, तुमचे सिम कार्ड बंद होईल. सुरु ठेवण्यासाठी लिंक पाठवतो, त्यावर 10 रुपयांचा रिचार्ज मारा,’ असे सांगत तक्रारदार यांच्या खात्यावरुन 3 लाख 5 हजार 700 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाटेत थांबलेल्या चार युवकांना काय झालं, असे विचारल्याच्या कारणावरून एका युवकाचा बुक्कीने दात पाडल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे दि.२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल जप्त केली आहे. सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय 31) रा. व्यापारी पेठ, ओगलेवाडी ता. कराड असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
सातारच्या आयटीआयच्या क्रीडांगणाचा योग्य विकास, आयटीआय प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, विद्यार्थी व प्रशासनाच्या विविध समस्या, इत्यादी बाबत दीपावलीनंतर तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. विभागांची संयुक्त बैठक घेवून या समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
गत नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सुमारे सहा जागा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी पालिकेला युती करायची की नाही? यावर सदर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून सर्वच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.
बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.