maharashtra

सिम कार्डच्या बहाण्याने एकाची 3 लाखांची फसवणूक


3 lakh fraud under the pretext of SIM card
'हॅलो, तुमचे सिम कार्ड बंद होईल. सुरु ठेवण्यासाठी लिंक पाठवतो, त्यावर 10 रुपयांचा रिचार्ज मारा,’ असे सांगत तक्रारदार यांच्या खात्यावरुन 3 लाख 5 हजार 700 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : 'हॅलो, तुमचे सिम कार्ड बंद होईल. सुरु ठेवण्यासाठी लिंक पाठवतो, त्यावर 10 रुपयांचा रिचार्ज मारा,’ असे सांगत तक्रारदार यांच्या खात्यावरुन 3 लाख 5 हजार 700 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय नामदेव निकम (वय 54, रा.सदरबझार) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 26 रोजी घडली आहे. तक्रारदार यांना अज्ञाताने फोन करुन सिमकार्डचा रिचार्ज संपेल, त्यासाठी 10 रुपयांचा रिचार्ज मारा असे सांगून व्हॉट्सअपवर लिंक पाठवली. तक्रारदार यांनी त्या लिंकवर क्लिक करुन प्रोसिजर केली. मात्र संबंधित कॉल व ती लिंक फसवी असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले नाही. याचा गैरफायदा घेत अज्ञाताने त्या फसव्या लिंकच्या आधारे तक्रारदार यांच्या खात्यातून 3 लाख 5 हजार 700 रुपये चोरुन घेतले. याप्रकरणी फसवणूकीसह आयटी ऍक्टचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.