maharashtra

गुरुवार परज येथील जुगार अड्ड्यावर छापा


Raid on a gambling den at Guruwar Paraj
गुरुवार परज येथे गुरुवारी सांयकाळी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या रेडमुळे जुगारबाजांची पळापळ झाली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

सातारा : गुरुवार परज येथे गुरुवारी सांयकाळी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या रेडमुळे जुगारबाजांची पळापळ झाली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
पालिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशीरायर्पंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.