Satara

esahas.com

सातारा शहर परिसरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच

चोरट्यांनी याचीच संधी साधत अपार्टमेंटमधील तक्रारदार यांचा व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. 2 रोजी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते.

esahas.com

चोरी झालेल्या सोन्यावर मैत्रिणीनेच मारला होता डल्ला

दि. 13 ऑक्टोबर रोजी गुरुवार पेठेत चोरी झाल्याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे राणीहार व सोन्याचे गंठण लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

esahas.com

तेजोमयी उत्सवाची आजपासून जल्लोषी सुरवात

सातार्‍यात यंदा दिवाळी जोरदार होणार असून बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील संसर्गदर दीड टक्क्यांवर आला असल्याने सातारकरांनी भीती बाजूला ठेऊन दिवाळीची खरेदी, पणत्यांची आरास आणि लक्ष्मी पूजनाच्या पारंपारिक स्वागताची तयारी केली आहे.

esahas.com

जिजामातानगर शाळेत आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा 

जिजामातानगर, ता. कराड येथील प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचे हे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केले. यामध्ये सर्व इयत्तांचे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. सदर, कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील शाळेत जमा करण्यात आले. 

esahas.com

ट्रक - कार अपघात

सातारा शहरानजीक ट्रक व कारचा अपघात झाला. ही घटना दि. 1 रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी नितीन दिलीप कुलकर्णी (ठाणे) यांनी ट्रक चालक अर्जुन रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.गंगापूर, औरंगाबाद) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीस पळवले

सातारा येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या श्रीकृष्ण कॉलनी येथून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार एका महिलेने दिली आहे.

esahas.com

सेंट्रिंग प्लेटा चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

सातारा येथील व्यंकटपूरा पेठेतील चैतन्य वास्तू अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून सोळा हजार रुपये किंमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरी कणराऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. सोमवती विजय घाडगे आणि सुरेखा शिवाजी जाधव अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

esahas.com

सराईत चोरटा शाहूपुरी पोलीसांकडून जेरबंद

सातारा शहर परिसरातील अट्टल दुचाकी चोरटा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी ऊर्फ विकास मुरलीधर मुळे यास तडीपार करण्यात आले होते. मात्र, सातारा शहरातून तडीपारीची कारवाई झालेली असतानाही तो ऐन दिवाळीत सातारा शहरातील बाजारपेठेत फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

esahas.com

दुकान फोडून साहित्य चोरणारे दोघे ताब्यात

सातार्‍यातील करंजे येथे दुकान फोडून त्यातून 50 हजार रुपयांचे साहित्य चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन असून संशयितांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात पोलिसांनी हा गुन्हा ओपन केला आहे.

esahas.com

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल निधीसंदर्भात दिवाळीनंतर मुंबईत बैठक

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे.