Satara

esahas.com

गुटखाविक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा

शासनाचा आदेश डावलून सुगंधी तंबाखू, पानमसाला तसेच गुटखा विक्री व बाळगल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात युवराज पोपट यादव (रा. नवीन एमआयडीसी) आणि किरण बोंबीलवाला (रा. चंदनगर) या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

esahas.com

बनावट दस्त नोंद करणार्‍या दोघांवर गुन्हा

बनावट दस्ताची नोंदणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

esahas.com

पाटबंधारे वसाहतीतील चोरीप्रकरणी गुन्हा

कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा सातारा येथे नव्याने होणार्‍या मेडिकल कॉलेजसाठी देण्यात आली आहे. या जागेत पाटबंधारे विभागाची कार्यालये, वसाहती तसेच इतर निवासी, अनिवासी इमारती आहेत. या इमारती पाडण्याचे काम शासनाच्यावतीने हाती घेण्यापूर्वीच चोरट्यांनी धुडगूस घालत इमारतींची तोडफोड केली सुरू केली आहे.

esahas.com

सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यास अटक

निशांत धोगडी हा शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये गेला होता. त्याने सोन्याची चेन खरेदी करायची असल्याचे सांगून दुकानदाराकडून चेन बघण्यासाठी घेतली. त्यानंतर संधी साधून तो 30 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन घेऊन तो दुकानातून पसार झाला.

esahas.com

कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : ना. शंभूराज देसाई

राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

esahas.com

महाराष्ट्रात दंगली भडकवणाऱ्यांना अटक करून कडक शासन करावे

महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे साताऱ्यात दंगली घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि कोणीही अशाप्रकारे दंगली, जाळपोळ करणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दंगलीस प्रोत्साहन देण्यासाठी रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, तालिबानी जर साताऱ्यात लपून बसले असतील तर त्यांना ताबडतोब अटक करावी.

esahas.com

शिवसेनेचे पोवई नाक्यावर आंदोलन

अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली. सेनेच्या नियोजित जोडे मारो आंदोलना पूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतल्याने आंदोलकांचा मात्र हिरमोड झाला.

esahas.com

कराडात 'बळीराजा'चे धरणे सातव्या दिवशीही सुरूच  

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे.

esahas.com

हिवाळ्यात पपई खाण्याचे फायदे

पपईमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, डी आणि कॅल्शियम, लोह, प्रथिने इत्यादी घटक मुबलक प्रमाणात असतात, याच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजार दूर होतात.

esahas.com

कराड पालिकेचे ‘होम टू होम’ जनजागृतीत सातत्य

शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.