विवाहितेला त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिल्हा बँकेच्या उज्ज्वल परंपरेची घोडदौड कायम ठेवून बँक यशाच्या उच्च शिखरावर नेण्याची ग्वाही नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी यावेळी दिली.
देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.
म्हसवे, ता. सातारा येथील एका घरात अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासात केली असून या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.
महामार्गावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करून वाहनधारकांना ऑनलाइन ई - चलन पाठविण्यात येते. मात्र बहुतांशी वाहनधारक ई - चलन मिळूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जाणार असून वाहनधारकांनी महाट्रॅफिक ॲपद्वारे आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड किंवा आपले वाहन काळ या यादीत टाकण्यात आलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड आकारला गेला असल्यास सदरचा दंड वेळेत भरून आपले वाहन काळ्या यादीत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ' साहस वार्ता ' शी बोलताना केले.
सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचा ज्युनियर सदस्य वर्धिश विजय लिगाडे याने गिरनार पर्वत सर केला. सदाशिव ट्रेकिंग ग्रुपच्या सोळा सदस्यांनी गिरनार ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यामध्ये सर्वात तरुण (लहान) सदस्य वर्धिश विजय लिगाडे (वय ७ वर्ष), कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल, मलकापूरचा वरिष्ठ गट, तुकडी - अ चा विद्यार्थी आहे. वर्धिशने गिरनार डोंगररांगाच्या 9 हजार 999 पायऱ्या ५.३० तासात चालत पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
शिवराज पेट्रोल पंपापासून गोडोलीकडे येणारा मार्ग हा सातारा शहरात कोल्हापूरकडून प्रवेश करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. सातारा शहराच्या आसपासच्या पर्यटनाच्या दृष्टीने सातारा शहराला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व आणि गरज विचारात घेवून, सी. आर. एफ फंडामधून गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेरचा रस्ता चारपदरी करणे आणि सुधारणे या कामासाठी रुपये 10 कोटींचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. लवकरच या रस्त्याला सी. आर. एफ मधून मंजूरी मिळेल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये 10 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन उत्सव साजरा होणार असून त्याउद्देषाने नागरिक एकत्र येण्याची शक्यता असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकामी यावर्षी साजरा करण्यात येणार शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पार पाडणे आवश्यक असल्याने महाबळेश्वर च्या तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुषमा पाटील यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार आदेश जारी केले आहेत.
मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून दोन परदेशी नागरिकांनी पैसे काढल्याची घटना घडली होती. आता याच परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही बनावट एटीएमद्वारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा प्रताप समोर आला आहे.