विवाहितेला त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : विवाहितेला त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पती अजिंक्य लोखंडे, सासरे सोमाजी लोखंडे, सासू कुसुम व नणंद (सर्व रा. नवी एमआयडीसी, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रतिक्षा अजिंक्य लोखंडे (वय 22, रा.नवीन एमआयडीसी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2019 पासून वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


