maharashtra

गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप रस्ता लवकरच होणार चारपदरी

ना. नितिन गडकरी यांच्याकडे खा. उदयनराजे यांनी पाठवला प्रस्ताव

The road from Godoli to Shivraj petrol pump will be four-lane soon
शिवराज पेट्रोल पंपापासून गोडोलीकडे येणारा मार्ग हा सातारा शहरात कोल्हापूरकडून प्रवेश करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. सातारा शहराच्या आसपासच्या पर्यटनाच्या दृष्टीने सातारा शहराला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व आणि गरज विचारात घेवून, सी. आर. एफ फंडामधून गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेरचा रस्ता चारपदरी करणे आणि सुधारणे या कामासाठी रुपये 10 कोटींचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. लवकरच या रस्त्याला सी. आर. एफ मधून मंजूरी मिळेल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा :  शिवराज पेट्रोल पंपापासून गोडोलीकडे येणारा मार्ग हा सातारा शहरात कोल्हापूरकडून प्रवेश करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. सातारा शहराच्या आसपासच्या पर्यटनाच्या दृष्टीने सातारा शहराला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व आणि गरज विचारात घेवून, सी. आर. एफ फंडामधून गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेरचा रस्ता चारपदरी करणे आणि सुधारणे या कामासाठी रुपये 10 कोटींचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. लवकरच या रस्त्याला सी. आर. एफ मधून मंजूरी मिळेल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
लिंबखिंड ते खिंडवाडी हा राष्ट्रीय महामार्ग सातारा शहरातून जातो. या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने निधी उपलब्ध करुन घेवून या रस्त्यापैकी मोळाचा ओढा ते करंजे व्हाया एसटी स्टॅन्ड ते गोडोली शिवराज पेट्रोल पंप या रस्त्यापैकी मोळाचा ओढा ते गोडोली अखेरच्या रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आलेली आहे.
गोडोली नाका ते शिवराज पेट्रोल पंपाचा भाग गतवर्षी नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेला आहे. या रस्त्यावर राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांसह, व्यावसायिक वाहनांचा आणि खाजगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. तसेच सातारा शहराजवळ असणाऱ्या कास पठार, ठोसेघर, भांबवली धबधबा, सज्जनगड, महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर या पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक बहिस्थ वाहनांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावरुन असते. युवाकार्यकर्ते संग्राम बर्गे आणि विलासपूरच्या उदयनराजे मित्रसमुहाच्या कार्यकर्त्यांकडून हा रस्ता रुंदीकरण व सुधारणा होण्याकरिता पाठपुरावा होत आहे. या सर्व बाबीचा विचार करुन, सुरक्षित वाहतुकीसाठी गोडोली ते शिवराज पंप अखेर सुमारे 1400 मिटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सन 2022-23 च्या केंद्रीय मार्ग निधीमधून प्रस्तावित केलेले आहे. यामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण, दुभाजक, आरसीसी गटर, फुटपाथ, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश आहे.
 देशाचे रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे या विकासकामाचा सी. आर. एफ मध्ये समावेश होण्याबाबत रितसर प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच या रस्त्याकरिता सीआरएफ मधून निधी उपलब्ध होईल आणि या कामाची पुढील कार्यवाही सुरु होईल, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.