Satara

esahas.com

कराडात एकाला लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून मारहाण; दोघांना अटक

शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

esahas.com

राजधानी सातारा मध्ये श्री. छ. शिवाजी महाराजच वंचित 

श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असताना दिसून येत आहे. त्याचे मागून राजधानी सातारा चा सेल्फी पॉईंचे पण काम सुरु होऊन पूर्ण होऊन त्याचे मोठ्या दिमाखात उदघाटन पण झाले. एवडी सगळी कामे जलद गतीने होत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत कि त्या श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे करत आहेत

esahas.com

विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी

विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे आणि झाडे लावण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. याबाबत राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून निर्बंधांबाबत अधिक स्पष्टीकरण व निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला (एएआय) पत्र पाठवून निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे.

esahas.com

साताऱ्यातील शर्मा दांपत्यांचा संघर्ष प्रेरणादायी : नंदकुमार फडके

वयाच्या पाचव्या वर्षी अपघाताने कोपरापासून दोन्ही हात गमावलेल्या दिनेश शर्मा यांनी स्वतःच्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक, व्यावसायिक व वैवाहिक जीवनात उल्लेखनीय यश संपादन केले. या वाटचालीत त्यांची पत्नी नितू शर्मा यांनी दिलेली साथ कौतुकास्पद असून या दांपत्यांचा संघर्ष व त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार  साताऱ्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदकुमार फडके यांनी काढले.

esahas.com

वारुंजीत आठ एकर ऊस जळून खाक

वारुंजी (विमानतळ) ता. कराड गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये ७  शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

esahas.com

कराड विमानतळ परिघात लावलेले निर्बंध उठवा

कराड विमानतळ परिसरात  लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.

esahas.com

कराड तालुक्यातील ११ हातपंपांचे पाणीनमुने दुषित

कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

esahas.com

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

पंधरा वर्षांच्या मुलीला मानलेल्या भावासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकून तिच्याशी गैरवर्तणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जया पवार, अभिजीत पवार रा. शाहूपुरी, महेश सोनवणे, कोमल पवार, उज्वला पवार रा. पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

esahas.com

चार दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने मुसक्या; तीन दुचाकी जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) विविध केलेल्या कारवाईत चार दुचाकी चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी संबंधित दुचाकी वाठार, सातारा व नऱ्हे जि. पुणे येथून चोरल्या असल्याची कबुली दिली असून यातील काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

esahas.com

कराडात शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी खोदलेल्या खड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.