Satara

esahas.com

कराड नगरपालिकेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, शाळा, मार्केट, स्वच्छ सोसायटी आदींचे मूल्यांकन व गुण प्रदान करून या स्पर्धेचा निकाल जाहीर  करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

esahas.com

वडूज मध्ये जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मनसेची मागणी

खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना घडले अस्वलाचे दर्शन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या कोयना अभयारण्यात मुंबईहून आलेल्या पर्यटकांना अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांना मोठा आनंद झाला. दरम्यान, त्याच्या दर्शनाने त्या अभयारण्यातील अस्वलाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.

esahas.com

गायब कवटी पुन्हा आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सक तोंडघशी

जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एक मानवी कवटी आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळात ही कवटी गायब झाल्याने या कवटीचे वृत्त निराधार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा ही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळल्याने कवटी नक्की कोणाची हे तपासण्याचे आव्हान शहर पोलीसांपुढे निर्माण झाले आहे.

esahas.com

सातारा जिल्ह्यात मकर संक्रांत पारंपारिक पध्दतीने साजरी

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

esahas.com

जाणून घ्या छत्रपती राजाराम महाराज यांचा मृ त्यू कशा प्रकारे झाला…

राजाराम महाराज हे जेवढे शांत आणि गंभीर होते तेवढेच ते मुत्सद्दी आणि पराक्रमी देखील होते. स्वराज्य संकटात असताना राजाराम महाराजांनी ते खऱ्या अर्थाने सावरले.

esahas.com

पारधी समाजाचे पुनर्वसन करायला हवी अधिकार्‍यांचीच मानसिकता

सातारा तहसिल कार्यालय परिसरात अनेक दिवसापासून फासेपारधी समाजातील काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. याबाबतीत प्रशासन अनभिज्ञ आहे, ही एक शोकांकिता आहे, या समाजाचे पुर्नवसन करण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात असताना सातारा जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासिन का आहे ? हे मात्र समजून येत नाही : महारुद्र तिकुंडे, संस्थापक-अध्यक्ष , युवाराज्य फौंडेशन

esahas.com

पारधी समाजाचे पुनर्वसन करायला हवी अधिकार्‍यांचीच मानसिकता

सातारा तहसिल कार्यालय परिसरात अनेक दिवसापासून फासेपारधी समाजातील काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. याबाबतीत प्रशासन अनभिज्ञ आहे, ही एक शोकांकिता आहे, या समाजाचे पुर्नवसन करण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात असताना सातारा जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासिन का आहे ? हे मात्र समजून येत नाही : महारुद्र तिकुंडे, संस्थापक-अध्यक्ष , युवाराज्य फौंडेशन

esahas.com

पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज

गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.

esahas.com

विज बिल चोरी व थकित असणाऱ्या चार उद्योजकांवर गुन्हा

विज बिल चोरी व थकित असणाऱ्या साताऱ्यातील चार उद्योजकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.