सातारा शहरातील भंगारवाल्यानी काही लोकप्रतिनिधीच्या बागलबचंच्याना सोबत घेऊन १७ लाख रुपयांना इमारती विकत घेऊन भंगारवाल्यानी दिवसाढवळ्या दरोडा टाकून चोरून नेला आहे. या दरोड्याची कोणत्याही अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला, हे निंदनीय आहे. याबाबत आ. महेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत केली.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने दीपक बाजीराव पिसाळ, वय ४४, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव याला सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
एकास खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रहिमतपूरनजिकच्या टकले -बोरगाव येथील मोटारसायकल चोर प्रतिक नारायण पवार वय २० याला कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जिल्ह्याच्या विविध भागातून चार मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चारही मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व आले पिकाच्या व्यापारासाठी अग्रगण्य बाजारपेठ म्हणून खेड नांदगिरी गावची ओळख. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सर्वच राजकीय नेतेमंडळीसह ग्रामस्थांनी पक्ष विरहित एकत्र येऊन केला. अन् म्हणतो ना 'गाव करी ते राव काय करी' तसचं घडलं.
मोटर सायकल चोरी प्रकरणी एकाला कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे, तर बोरखळ येथील झालेल्या रस्त्याच्या निधीचा पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे?
सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.