देऊर, ता. कोरेगाव येथील एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने, गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एकट्या गावाचा एकूण बाधितांचा आकडा 54 झाला आहे. अर्धशतकाच्या पुढे गेल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गावासह भागात चिंतेचे वातावरण झाले आहे.
‘सर्व गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक जाणिवेतून आदर्श निर्माण करत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी केले.
रहिमतपूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रहिमतपूर शहरामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून मंडळ विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
‘नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लागले. या निकालात कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पाल्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा घरी जाऊन पेढे देऊन नुकताच कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा व संघटनेला नवी दिशा देणारा आहे,’ असे गौरवोद्गार शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांनी व्यक्त केले.
‘सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने देखभाल करणार्या कर्मचार्याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन सिद्धेश्वर पुस्तके यांनी व्यक्त केले.
‘सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण ही आवश्यक असल्याने, हे ज्ञानार्जन व ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त असल्याचे महत्त्व डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पटवून दिले आहे,’ असे मत प्राचार्य युवराज गोंडे यांनी व्यक्त केले.
राऊतवाडी, ता. वाई येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव साळुंखे यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेतून 40 चिंचेची झाडे लावण्यात आली.
राऊतवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी स्वतःच व्यक्तीरेखा साकारून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून कोरोनावर मात करून आलेल्या तरुणाकडे पाहण्याचा सामाजाचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारा काल्पनिक परंतु वास्तविक ‘भ्रम’ नावाचा लघु-चित्रपट तयार केला आहे. त्यांच्या प्रबोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विवाह झालेल्या नवदाम्पत्यांनी खर्चाला फाटा देत, सामाजिक व विधायक विचारातून कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणार्या व कोरोनाशी सामना करणार्या चवणेश्वर गावातील हातावर पोट असणार्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.