गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पीक भुईसपाट झाले असून, घेवड्याच्यानंतर उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पाडळीस्टेशन-सातारारोड, ता. कोरेगाव येथे विना मास्क फिरणार्यांवर सातारारोड पोलिसांनी कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.
वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.
शेतकर्यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आज प्राचार्य भानुदास झांजुर्णे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करताना त्यांनी कमालीची शिस्त स्वत: अंगीकारली व मुलांनाही शिस्तप्रिय बनवले. तसेच प्राचार्य झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला आहे,’ असे प्रतिपादन किशोर बर्गे यांनी केले.
आजच्या युगात शेतकर्यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्यांच्या शेतात जाऊन विविध प्रात्यक्षिके राबवली.
वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.
निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने आणि आपल्या चिरकाल स्मृती, आठवण, सौहार्दपूर्ण जिव्हाळा जोपासण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात एकतरी झाड लावावे असे, आवाहन सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने केले आहे.
रहिमतपूर आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिका आणि कंपाउंडरवर पडत येत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.