क्रीडा

esahas.com
क्रीडा

सातार्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक

सातारा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले. तसेच गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरासमोरही काही अज्ञातांनी शेणी जाळण्याचा प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या असंतोषातून या घटना घडल्याचे समजले जात आहे.

esahas.com
क्रीडा

अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करताना महसूल अधिकार्‍यांच्या कामात अडथळा ः राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यासह दोघांवर गुन्हा 

होळ ता.फलटण येथे खंडाने घेतलेल्या जमिनीत अनधिकृत गौनखनिज तथा अवैधपणे माती मिश्रीत वाळूचा उपसा करीत पंचनामा व तेथील वाहने जप्त करीत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश माने व इतर अनोळखी दोघे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 120 ब्रास माती मिश्रीत वाळू काढल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.

esahas.com
क्रीडा

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट

दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व करोना योद्ध्यांचा सत्कारही केला.

esahas.com
क्रीडा

मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडप...

esahas.com
क्रीडा

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नयेत अशा सूचना आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपणाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )

esahas.com
क्रीडा

प्रशासनाच्या हाकेला उद्योजक, व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या प्रसंगात ऑक्सिजन सिलेंडरसाठी तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी आपण तातडीने कारखान्यावरील २० सिलेंडर उपलब्ध करून दिले. गेली २० ते २५ वर्षे आपण तालुक्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आलो आहे. नियतीने संधी दिल्यास आगामी काळातही जनतेला चांगली सेवा देऊ. - प्रभाकर घार्गे (माजी आमदार)

esahas.com
क्रीडा

कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरुः अवसायक मनोहर माळी

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मुळ कागदपत्रांसह संबंधीत शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही मनोहर माळी यांनी केले आहे.

esahas.com
क्रीडा

लॉकडाऊन आणखी कडक

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. त्यानुसार प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. 04 रोजीच्या 7 वाजल्यापासून ते दि. 10 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून या सेवा फक्त घरपोच देण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

esahas.com
क्रीडा

घरपोच विक्री करण्यासाठी नगरपरिषदेमध्ये  दोन दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

सातारा शहरात घरपोच विक्रीकरीता भाजीपाला, किराणा माल, दुध, फळे विक्रेत्यांची प्रथम यादी सातारा नगरपरिषदेच्या फलकावर डकविण्यात आली असुन यादीमधील विक्रेत्यांनी घरपोच विक्रीचे परवाने सातारा नगरपरिषदेच्या कोरोना कक्षातून प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.

esahas.com
क्रीडा

वाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक

लाखानगर वाई येथे दारु विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून सुमारे इंडिका कारसह एक लाख बारा हजार 840 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.