भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.
‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.
महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून संपूर्ण भारतभर अटकेपार झेंडे लावले असे शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव हे फलटण तालुक्यातील मुरूम आहे. हा इतिहास गेली कित्येक वर्ष कोणालाच माहीत नव्हता. मात्र, मध्यंतरी गेल्या सात-आठ वर्षांपासून हे गाव महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला येऊ लागले. या मुरुम गावच्या विकासासाठी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
‘महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
जावळी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.
खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा : खेड, ता. सातारा येथे अनाधिकाराने घराचे कुलूप तोडून मिळकतीबाबत आगळीक केल्याप्रकरणी व याबाबत जाब विचारल्यानंतर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रोहिदास शंकर सपकाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि.29 रोजी ते व त्यांची पत्नी घरी होते. यावेळी दुपारी 3 ते साडेतीनच्या दरम्यान, ज्ञानेश्वर किसन कदम आणि सौ. मनिषा ज्ञानेश्वर कदम आणि तेजस ...
सातारा : सातारा शहरात अवैध दारूधंद्यांवर पोलिसांनी छापे टाकून 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी, भिमाबाई आंबेडकर नगर येथील म्हाडा कॉलनीत असलेल्या एका बिल्डिंगच्या तळमजल्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 4 हजार 420 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या 36 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी स्वप्नील सुभाष घुसाळे रा. म्हाडा कॉलनी, सातारा यास सीआरपीसीनुसार नो...
सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.