भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.
लोणंद : भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.
सध्या वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधीत लोकांचे वेळीच विलगीकरण व्हावे, यासाठी भादे येथे आरोग्य विभागाच्या वतीने स्वॅब तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी शिरवळ येथून टेस्ट किट उपलब्ध न झाल्यामुळे भादे ग्रामपंचायतींचे सरपंच सौ. निलांबरी बुनगे व उपसरपंच विशाल गायकवाड यांनी अहिरे येथील आरोग्य केंद्रातून पन्नास टेस्ट किट उपलब्ध केले. मात्र, सर्व तयारी झालेली असूनही आरोग्य कर्मचार्यांना ऐनवेळी फोन आला आणि कॅम्प सुरू ठेवण्यास वरिष्ठ पातळीवरील दबावामुळे आरोग्य कर्मचार्यांनी असमर्थता दर्शवली असल्याचा दावा भादे ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटाने केला आहे. दरम्यान, याबाबत शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज वैद्यकिय अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हा कॅम्प उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
राजकारणामुळे लोकांच्या
जीविताशी खेळ : सौ. निलांबरी बुनगे
भादे गावच्या सरपंच सौ. निलांबरी बुनगे यांनी ग्रामपंचायत चांगले काम करत असताना विरोधक कोरोना काळातही राजकारण करत आहेत. तसेच हा भादे गावच्या लोकांच्या जीविताशी खेळ चाललेला आहे, असा आरोप विरोधकांवर केला आहे.आम्हा दोघांना बदनाम करण्याचा
प्रयत्न : यशवंत साळुंखे यांचा आरोप
या आरोपांबाबत जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई साळुंखे यांचे पती यशवंत साळुंखे यांनी हा मला आणि माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कोरोना सारख्या संकटाच्या काळात अशा प्रकारचे राजकारण कोणीही आणू नये. यावेळी आपली प्राथमिकता ही लोकांना मदत करण्याची असली पाहिजे. परंतु, सत्ताधार्यांकडून यावरूनही राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.जि. प. सदस्या पराभवाचा सूड असा सूड
घेताहेत : विशाल गायकवाड
काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई साळुंखे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलचा ग्रामविकास पॅनलने धुव्वा उडवत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. या पराभवाचा जिल्हा परिषद सदस्या अशा प्रकारे सूड घेत आहेत, असा थेट आरोप भादे ग्रामपंचायतींचे उपसरपंच विशाल गायकवाड यांनी केला आहे.