क्रीडा

esahas.com
क्रीडा

निढळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

‘सातारा सैनिक स्कूल’साठी 300 कोटी निधीची तरतूद

सातारा येथील ऐतिहासिक सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्‍न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत. 

esahas.com
क्रीडा

खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्‍या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

जावली तालुक्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करावी

कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे  सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी व तडीपार करून जावळी तालुका दारूमुक्त, जुगारमुक्त आणि मटका मुक्त करावा, अशी मागणी जावळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्याकड

esahas.com
क्रीडा

उसाच्या ट्रॉलीला ओमनीची धडक

कुडाळ (ता. जावली) येथे पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणार्‍या उसाच्या ट्रॉलीला ओमनी कारने धडक देऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटे हा अपघात झाला.

esahas.com
क्रीडा

अंबवडे ग्रामपंचायत ‘राष्ट्रवादी’ विचाराने कार्यरत राहणार 

‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय

‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची इतर कोणाशी तुलना करता येणार नाही,’ असे प्रतिपादन कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

‘भाजपा’ ओबीसी सातारा जिल्हा सरचिटणीस युवापदी बापू आटपाडकर यांची निवड

माण तालुक्यातील कुरणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवापदी निवड करण्यात आली आहे. 

esahas.com
क्रीडा

मोठी दुर्घटना ः वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू

कराड ः कराड तालुक्यातील कोळेवाडी-अंबवडे येथे वांग नदीच्या पुलावरून पाण्यात दुचाकीसह पडल्याने चौघे बुडाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला असून सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचविले. शनिवारी रात्री 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्...

esahas.com
क्रीडा

186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.