नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
‘परळी दर्याखोर्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला परळी आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचार्यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होतेच, याच पार्श्वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला.
‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले.
सातारा : आसले, ता. वाई येथील ओंकार चव्हाण यांचा निर्घृण खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणातील सुत्रधार गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव घटनेपासून पोलिसंना गुंगारा देत होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका हॉटेलमध्ये बंटी जाधव व त्याचा साथीदार नखील शिवाजी मोरे वय 24 वर्षे रा. फुलेनगर भुईंज ता. वाई यांच्या मुसक्या आवळल्या. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून करण्यात येऊन आरासानंतर शहरात ती सर्व फळे प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला.
‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यातील नेचल (हेळवाक) येथे बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे डबर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून मिळवले जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पाटण तालुका अध्यक्ष गोरख मारुती नारकर यांनी पाटणचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेचल (हेळवाक) येथील बंधारा या...
येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.