‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवनकार्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या भगिनींचा पुष्पगुच्छ, रोपे तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
तडवळे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणपत निवृत्ती खाडे-पाटील यांची तर उपसरपंचपदी संगीता भीमराव माळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्रिशंकू संख्याबळाच्या परिस्थितीत नाट्यमय घडामोडी घडण्याबरोबर ‘पाटीलकी’ने आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे.
मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून आईलाही काठीने बेदम मारहाण केली असल्याची घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी विनोद बबन शिंदे (वय 38, रा. सोनगाव) याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहीण-भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.
खंबाटकी घाटामध्ये आपले कर्तव्य बजावणार्या आणि महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी गस्त घालणार्या भुईंज येथील महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटक राज्य एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या एका प्रवासी व्यक्तीला गंभीर स्थितीत असताना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे त्या प्रवासी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली. महामार्ग पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणांनी कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.