विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्वरी व नवलाई देवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.
‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी निधी कमी पडू देणार आहे,’अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.
‘शेतकर्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांनी केले.
माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकरी व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या शेतकरी व उद्योजक महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र कष्ट करीत असतात, अशा महिलांना सक्षम महिला सन्मान हा पुरस्कार स्व. जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे सभासद नोंदणी होत आहे. सातारा जिल्हा मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या गोंदवले ता माण येथील राजगड मनसे पक्ष कार्यालयात हजारोंच्या संख्येने तरुणांनी मनसेचे सभासदत्व घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सभासद नोंदणी चा कार्यक्रम हा इतर राजकीय पक्षला प्रेरणादायी ठरणार आहे.
‘सार्वजनिक जीवनात काम करताना सामाजिक बांधिलकीची भावना महत्त्वाची असते,’ असे ह. भ. प. जयवंत जौंजाळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात वाढलेल्या मुलांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आम्ही कॉलेजला शिक्षक झालो तेव्हा हिंमतीने कामे केली. आज बाडसारखी मुले स्वतःचा व्यवसाय करून मोठी प्रगती करतात. शिक्षकाला दुसरे काय लागते? विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद शिक्षकास मोठा असतो,’ असे विचार
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.