बुधवार पेठेत अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल 39 पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय 28 वर्षे रा 59, बुधवार पेठ सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे.
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजा चिंताक्रांत झाल्याचे दिसत आहे.
फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी जिना टाकला असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने प्रसिद्ध करताच संबंधित जिना पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आदेश देताच पालिकेच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी काढून टाकला असून, दै.‘ मुक्तागिरी’च्या वृत्ताचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.
लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.
गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतास अचानक आग लागून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची वित्तहानी झाली आहे.
प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.
महाबळेश्वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारक
पुणे- बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावानजीक आज दुपारी वडाचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून येत्या शनिवारी (१० एप्रिल) आणि रविवारी (११ एप्रिल) कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स आजच जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकलसेवा मा...