खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वे कामासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.
सातारा शहरातील दहावीतील मुलांनी कोयत्याचा धाक दाखवण्यासाठी तो क्लासमध्ये नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून संशयितांकडून तो कोयता सॅकमधून जप्त करण्यात आला.
मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱ्या कारागिराने आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा, असे म्हणत सराफाचा विश्वास संपादन केला. यानंतर, पाचव्याच दिवशी त्याने दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना सातारा शहरात घडली.
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना एका कंपनीस गंडा घातल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
कराडच्या कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल रविवारी पाडण्यास सूरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.