मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथ बाळकृष्ण पोतदार रा. धामणेर स्टेशन, ता. कोरेगाव हा त्याची दुचाकी क्रमांक एमएच 11 डीसी 4183 वरून निघाला असता विशाल बिभीषण धुमाळ रा. कळंबी, पुसेसावळी, ता. खटाव याने त्याच्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीजी 9277 ही भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवीत रॉंग साईडने सोमनाथ यांच्या गाडीस धडकवली. या अपघातात सोमनाथ पोतदार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.


