एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित रावसाहेब कदम राहणार पेरले, ता. कराड यांची व अरुण रावसाहेब माने रा. बनवडी ता. कराड यांची मैत्री होती. माने यांच्या सांगण्यावरून रोहित कदम यांनी आयएमडीएस इन्स्टिट्यूट ऑफ महा ई लर्निंग अँड दिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड, महाउद्योजक ग्रुप यांच्याशी बेबी डायपर प्रोजेक्ट करार केला. करारानुसार दिनांक 28 ऑगस्ट 2020 ते 30 मे 2019 पर्यंत कामकाज सुरळीत चालू होते. त्यानंतर अरुण माने, हर्षद इनामदार, अमोद गोविंद शिंदे या तिघांनी कदम यांच्या घरी वरचेवर येऊन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, तुझाच फायदा आहे. तू एक मोठा उद्योजक बनशील तसेच तुला आमच्या कंपनीमध्ये डायरेक्टर बॉडी मध्ये पण घेतो, असे आमिष दाखवले आणि दोन महिन्यांनी प्रोजेक्ट घेण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ट्रांजेक्शन मधून कदम यांच्याकडून सुमारे 35 लाख रुपये घेतले. यानंतर कदम यांना प्रोजेक्ट साठी लागणारी मशीन व दरमहा ठरलेले हप्ते यातील काही एक मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहित कदम यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.