अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जानेवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मोहन देवजी पटेल रा. कृष्णा हाऊसिंग सोसायटी, करंजे पेठ, सातारा हा अशोक हनुमंत राजे भोसले राहणार विसावा नाका सातारा हे त्यांच्या स्कुटी क्र. एम एच 11 डीएफ 9614 या वाहनावरून कोरेगाव रस्त्याकडे जात असताना संगम माहुली कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना मोहन पटेल याने स्कुटी चा अचानक ब्रेक मारल्याने आणि सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे तोल जाऊन स्कुटी पडल्याने मागे बसलेला अशोक हनुमंत राजेभोसले हा बाजूने चाललेल्या उसाच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली पडला. या अपघातात अशोक राजेभोसले यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोहन पटेल यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


