रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जानेवारी रोजी जाधववाडी हद्दीतील जुन्या सरकारी दवाखान्याजवळ मोटरसायकल स्लिप होऊन घसरून सचिन संपत यादव वय 45 रा. गिरवी, ता. फलटण यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर केईएम हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू होते. परंतु त्यांच्या डोक्याला मुका मार लागल्याने व मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे शहाजी संपत यादव यांनी त्यांना फलटणमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेथे औषध उपचार सुरू असताना त्यांचा दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार वीरकर करीत आहेत.


