महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा परत येतेय हास्याचा चौकार घेऊन !

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येत आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात दीडशे महिलांच्या नावाची शेती सातबाऱ्यावर नोंद

सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, जावली या तीन तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये दीडशे महिलांचे नाव शेत जमिनीच्या सातबार्‍यावर लागले आहे. लक्ष्मी मुक्ती अभियानांतर्गत ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, अशी क्रांतिकारी माहिती दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम-बलकवडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शाश्वत विकासासाठी मानवी विकास महत्त्वाचा : चंद्रकांत दळवी

गावाचा विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसून आर्थिक विकास आणि मानवी विकास सुद्धा महत्वाचा आहे. मानवी विकासातूनच शाश्वत विकास साधला जातो, असे प्रतिपादन निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

स्वराज पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी दिगंबर आगवणे गजाआड

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालकांवर बेछूट आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या दिगंबर आगवणे यास स्वराज नागरी पतसंस्थेकडून दाखल असलेल्या फसवणुकीच्या तक्रारप्रकरणी अटक केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

९ लाख १० हजार रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी सौ उज्वला संपत माने, रा. वरद कलेक्शन, देगाव, ता. सातारा या महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोन दुचाकींची चोरी

दोन वेगवेगळ्या घटनांमधून सातारा शहर व परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या तडीपरीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकास मुरलीधर मुळे, वय २२, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पानवण फाटा येथे डंपरने दुचाकीला ठोकारले ; तिघेजण जखमी

पानवण फाटा, ता .माण येथे आज, सोमवारी सकाळी वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासाहेब चव्हाण, सुधीर शामराव शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमीमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकी चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

मोपेड दुचाकी चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव, रा. बौद्धवस्ती, कोडोली, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.