maharashtra

पानवण फाटा येथे डंपरने दुचाकीला ठोकारले ; तिघेजण जखमी

एकाची प्रकृती चिंताजनक, तहसीलदारांच्या गाडीला ग्रामस्थांनी घातला घेराव

पानवण फाटा, ता .माण येथे आज, सोमवारी सकाळी वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासाहेब चव्हाण, सुधीर शामराव शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमीमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सातारा : पानवण फाटा, ता .माण येथे आज, सोमवारी सकाळी वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासाहेब चव्हाण, सुधीर शामराव शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमीमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पानवण येथील बारावीत शिकणारे समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासो चव्हाण, सुधीर शामराव शिंदे हे तिघे देवापूर, ता .माण येथील विद्यालयात शिकत आहेत. शाळेत जादा तास असल्याने ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरातून दुचाकीवरून देवापूरला निघाले. त्यांची दुचाकी गंगोती फाट्याजवळ आली असता समोरुन वाळूने भरलेल्या भरधाव डंपर क्रमांक एम.एच. ११ एएल ४८४५ ने विद्यार्थ्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ४२ एन ५२०१ त्यांना जोरात धडक दिली. या धडकेत तिन्ही मुले उडून बाजूला पडली. यामध्ये तीन ही विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी शुभम चव्हाण व सुधीर शिंदे यांना म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर समाधान नरळे यास पुढील उपचारार्थ प्रथम अकलूज येथे नेण्यात आले. मात्र, तेथे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला तेथून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला.