९ लाख १० हजार रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी सौ उज्वला संपत माने, रा. वरद कलेक्शन, देगाव, ता. सातारा या महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : ९ लाख १० हजार रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी सौ उज्वला संपत माने, रा. वरद कलेक्शन, देगाव, ता. सातारा या महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. उज्वला संपत माने यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आपण कर्मचारी असल्याचे भासवत गुंतवणूक केलेल्या पैशावर २५ टक्के व्याज देईन असे सांगून आशा पोपट जाधव, वय ५७, मुळ रा. अतित, ता. सातारा सध्या रा. गणेशनगर, बोपखेल, पुणे या महिलेकडून ऑनलाईन ट्रान्सफर व रोख स्वरूपात ९ लाख १० हजार रुपये स्वीकारून ते पैसे परत न देता फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


