maharashtra

दोन दुचाकींची चोरी


दोन वेगवेगळ्या घटनांमधून सातारा शहर व परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमधून सातारा शहर व परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दि. २८ जुलै ते दि. ३ ऑगस्ट २०२२ दरम्यान सातारा येथील दौलत नगर परिसरात असणाऱ्या ग्रीन सिटी अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक  एम.एच.०९- सीसी २१९० अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमृतराज देवेंद्र जाधव,  वय ३०, रा. शिवाजीनगर,  दहिवडी,  ता. माण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. ६ ऑगस्ट रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास गोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या  हॉटेल लेकव्हुवच्या पार्किंगमध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.१२ सीके ३८२५ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अक्षय जयवंत साळुंखे, वय २५, रा. दहिवडी, ता. माण याने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.