maharashtra

आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Offense against one for disobeying orders
पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या तडीपरीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकास मुरलीधर मुळे, वय २२, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या तडीपरीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकास मुरलीधर मुळे, वय २२, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  विकास मुरलीधर मुळे याला पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी दि.‌२ ऑगस्ट २०२१ रोजी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला होता. असे असताना तो दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी सातारा शहरातील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराच्या समोर रस्त्यावर आदेशाचे उल्लंघन करून वावरताना आढळून आल्याची तक्रार पोलीस कर्मचारी ओंकार यादव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. केल्याप्रकरणी विकास मुरलीधर मुळे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.