उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.
मंदिरातील दोन मुकुट आणि रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे.
वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
रहिमतपूरनजिकच्या टकले -बोरगाव येथील मोटारसायकल चोर प्रतिक नारायण पवार वय २० याला कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जिल्ह्याच्या विविध भागातून चार मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चारही मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
भक्तवडी-रेवडी रस्त्यावरील वसना नदीवरील बंधार्यात पोहण्यास गेलेल्या ऊस तोडणी कामगार सुरेश बंडू उगले याचा बुडून मृत्यू झाला, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगावच्या दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांचा देखील बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कोरेगाव शहरात शोककळा पसरली आहे.
रेशनिंग दुकानदारास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.