एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता चंद्रकांत शिवाजी भोसले, शुभम चंद्रकांत भोसले, प्रियंका शुभम भोसले या तिघांनी हणमंत भोसले यांच्या राहत्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश करून शेतात जाण्यासाठी वाट मागतोस का, या कारणावरून हणमंत भोसले यांना काठीने मारहाण केली आहे. याबाबतची फिर्याद राणी हणमंत भोसले रा. शिरगाव, तालुका वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.