maharashtra

मलकापूर येथून मोटरसायकलची चोरी


अज्ञात चोरट्याने मलकापूर येथून मोटरसायकलची चोरी केल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : अज्ञात चोरट्याने मलकापूर येथून मोटरसायकलची चोरी केल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान मलकापूर तालुका कराड येथील शशी वडेवाले हॉटेलच्या शेजारी भिंतीच्या आडोशाला पार्क केलेली शशिकांत दिनकर देवे रा. नांदलापूर ता. कराड यांची चाळीस हजार रुपये किमतीची, होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच 11 एक्यू 5830 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए व्ही पवार करीत आहेत.