अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळाले आहे. यामध्ये तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉस एंजलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस एशिया यूएसएमध्ये मुंबईच्या राधिका राणे-भोसले हिने बाजी मारत ‘मिसेस एशिया यूएसए फर्स्ट रनरअप’ पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बिपीन रावत हे आज सकाळी ८.४७ वाजता दिल्ली विमानतळ येथून विशेष विमानाने सुलूर येथे पोहचले होते. तिथे ११.३४ वाजता पोहचल्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. त्यात ते लेक्चर देणार होते. मात्र, ११.४८ वाजता सुलूर येथून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आले.
जगाचा सगळा समतोल हा गुरुत्वाकर्षणामुळे टिकून राहिला आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते तर तिथे किती उठाठेव करावी लागते हे आपण पाहतोच. जग हे पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे हे कुणीही नाकारणार नाही. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो हे तर सर्वांनाच माहित आहे. पण हे पूर्णपणे खरे आहे का? तर नाही. आज एका अशा ठिकाणाची ओळख तुम्हाला होणार आहे जिथे गुरुत्वाकर्षण कामच करत नाही.
कोरोना संसर्गाची लागण झाल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत राज्य सरकारं चालढकल करत असल्याबाबत सुप्रीम कोर्टाने आज नाराजी व्यक्त केली व कठोर शब्दांत राज्यांची खरडपट्टी काढली. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान ही राज्ये सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावर होती.
कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमतीत एक डिसेंबरपासून तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कडप्पा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर अनंतपुरमध्ये ७ आणि चित्तूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या काही भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. हेलिकॉप्टर बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पायलटने या हेलिकॉप्टरचे उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे हेलिकॉप्टर कोसळले.
आफ्रिकन देश सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट झाला. या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असे मत मांडले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्ज घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे, अशा पध्दतीचे विधान केंद्रीय मंञी रामदास आठवले यांनी केले.