युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही.
आज जागतिक महासत्ता होऊन पाहणाऱ्या देशांच्या शर्यतीत हा रशिया प्रबळ दावेदार आहे. जगातील सगळ्यात मोठा देश असलेल्या या राष्ट्राला सांभाळणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. या देशाचा सर्वोच्च व्यक्ती देखील तितकाच कठोर असला पाहिजे आणि याबाबतीत रशियाने नशीब काढले असे म्हणावे लागेल! कारण जगातील सर्वात धाडसी आणि महत्त्वकांक्षी राष्ट्रपती वाल्दीमिर पुतीन त्यांच्याकडे आहेत.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता आहे का? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकाचे मनात येतात यावर विस्तृत माहिती
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे. तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे.
वाचकांना एकाच विषयावरील माहिती देणारे तसेच त्यांना सदृढ आरोग्याचा मंत्र देवून त्यांचे प्रबोधन करणारे आणि आरोग्य या एकाच विषयावर भाष्य करणारे ‘आरोग्य स्पंदन’ हे मासिक मराठी भाषिक वाचकांसाठी अत्यंत उपुयक्त असे आहे. यातील माहिती आणि आकर्षक मांडणीमुळे ते दर्जेदार व वाचनीय झालेले असून हे दर्जेदार मासिक हिंदी भाषेतूनही प्रकाशित केल्यास त्याचा असंख्य वाचकांना लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. मात्र, या शर्यतींमध्ये पशू क्रूरती प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे राज्य सरकारसोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे.
अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळाले आहे. यामध्ये तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.