deshvidesh

अमेरिकेतील 5 राज्यांत चक्रीवादळाचे थैमान

७० हून अधिक जणांचा मृत्यू

Hurricane Thaman in 5 US states
अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळाले आहे. यामध्ये तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

इलिनोइस : अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळाले आहे. यामध्ये तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे इतिहासातील सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांनी प्रतिक्रिया देताना "ही एक शोकांतिका आहे आणि आम्हाला अद्याप किती लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे माहीत नाही. शोध आणि बचाव अधिकारी वेगाने बचावकार्य करत असून घराच्या ढिगाऱ्याखाली असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे." फक्त एकट्या केंटकीमध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बरेच जण मेणबत्ती कारखान्यात काम करत होते.
इलिनोइसमधील एका गोडाऊनमध्ये कमीतकमी सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते ख्रिसमससाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून ऑर्डरची तयारी करत होते. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी "केंटकीच्या इतिहासातील सर्वात वाईट, सर्वात विनाशकारी आणि सर्वात घातक चक्रीवादळ आहे. आपण 100 हून अधिक लोक गमावू शकतो अशी भीती वाटत आहे. मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ही आपत्ती खूप मोठी आहे आणि मला ते शब्दात सांगणे खूप अवघड आहे" असे म्हटले आहे.
"चक्रीवादळाने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये माजवला हाहाकार"
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मेफिल्ड शहरातील मेणबत्त्या कारखान्यात छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यांनी मध्यरात्रीपूर्वी आणीबाणी जाहीर केली होती. या वादळाने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे." तसेच महापौरांनी देखील भीषण परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. तसेच इमारती कोसळल्या असून घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांनी ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.