deshvidesh

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ


Rs 100 increase in price of commercial gas cylinder
कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमतीत एक डिसेंबरपासून तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमतीत एक डिसेंबरपासून तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कमर्शिअल सिलेंडरच्या दरात गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच दोन महिन्याच्या आत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये 366 रुपयांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत कायम आहे.
इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस
सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करावे की, त्यात वाढ करावी याबाबत या आढाव्यात निर्णय घेतला जातो. प्रत्येक कंपनीकडून बैठकीनंतर दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. पण, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.