theunfortunatedeathofabrotherandsisterwhodrownedinafarminromanwadi

esahas.com

रोमनवाडीत शेततळ्यामध्ये बुडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.