tenhousescaughtfireinhusbandwifequarrel;lossofrs.50lakhs

esahas.com

पती- पत्नीच्या भांडणात लागली दहा घरांना आग; 50 लाख रूपयांचे नुकसान

माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.