sonerinews

esahas.com

कोरेगावातील स्वच्छतागृह खुले करण्यासाठी ‘सोनेरी ग्रुप’चे भीक मांगो आंदोलन

येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.