saurabhvermapvsindhuwon;sainaoutduetoinjury

esahas.com

सौरभ वर्मा, पीव्ही सिंधू विजयी; सायना दुखापतीमुळे बाहेर

बुधवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून निवृत्त व्हावे लागले. के. श्रीकांतचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले.