pachganipalikanews

esahas.com

पाचगणी पालिकेने गांधीजींच्या स्मृतींचे टाकाऊ लोखंडी वस्तूपासून साकारले टिकाऊ शिल्प

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे.