coronapatientpalayannews

esahas.com

फलटण ग्रामीण रुग्णालयाचा गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.