विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कोण संजय राऊत? असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. ’सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी अजित पवारांवर दबाव असल्याचं म्हणत, त्यांच्या भाजपसोबतच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी आमची वकिली करु नका असं म्हटलं होतं. मग आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!