युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता,
मुंबई : जून 2019 मध्ये, भारताचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंगने पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय खेळातून आपली निवृत्ती जाहीर केली आणि भारतसह भारताबाहेरील देखील आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मात्र आता युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता, अनेकांचा असा विश्वास होता, की युवराज अजूनही खेळू शकेल. त्यावेळी आणखी एक मालिका युवराज खेळेल आणि मग आपली निवृत्ती घोषित करेल असच साऱ्यांना वाटले होते. पण दुर्दैवाने युवराज पुन्हा भारताच्या निळ्या जर्सीत चाहत्यांना पाहायला मिळालाच नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली. मात्र आता युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. युवराज सिंगने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याने असे संकेत देत साऱ्यांनाच सुखदः धक्का दिला आहे. या पोस्ट मध्ये युवराजने तो फेब्रुवारीमध्ये क्रिकेट जगतात परत येत असल्याचे संकेत दिले आहेत.