sports

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधी धक्कादायक घटना

श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची गोळी झाडून हत्या

A shocking incident before Team India's tour to Sri Lanka

 टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत 27 जुलौपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया लवकरच श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची हत्या झाली आहे. 

श्रीलंकेचा माजी क्रिकेटर धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) याची हत्या झाली आहे. या घटनेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री त्याच्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने निरोशनच्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. निरोशन पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता.

धम्मिका निरोशनची कारकीर्द-

धम्मिका निरोशन (22 फेब्रुवारी 1983 - 16 जुलै 2024), ही श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू होती . त्याने 2000 मध्ये सिंगापूर विरुद्ध श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील संघाकडून पदार्पण केले. वरिष्ठ प्रथम श्रेणी पदार्पण करण्यापूर्वी त्याने दोन वर्षे अंडर 19 कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. धम्मिका निरोशन चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब आणि गॅले क्रिकेट क्लबसाठी देशांतर्गत श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये खेळला.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा-

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs SL) खेळवण्यात येणार आहे. पहिला टी-20 सामना 27 जुलै रोजी असेल, तर दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला असेल. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) फॉरमॅटमधून राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टी20 मालिकेचं वेळापत्रक 

पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै  
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै

एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

पहिली मॅच :2 ऑगस्ट 
दुसरी मॅच : 4 ऑगस्ट 
तिसरी मॅच : 7 ऑगस्ट